ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
बल्बन, घियासुद्दीन
बल्बन, घियासुद्दी न : (? १२०७ – ? १२८७). गुलाम घराण्यातील दिल्लीचा नववा सुलतान. अल्तमशच्या तुर्की गुलामांतील एक विश्र्वासू गुलाम. ह्याचे पूर्वज एलबरीमधील होते. ह्याचे मूळ नाव वहाउद्दीन. अल्तमशने बल्बनची गुलामगिरीतून मुक्तता करून त्याची नियुक्ती चाळीस सरदारांच्या गटात केली. रजिया सुलतानाच्या कारकीर्दीत अमीर-इ-शिकार या पदावर त्यास बढती मिळाली.
कुत्बुद्दीन ऐबक
कुत्बुद्दीन ऐबक : (?—१२१०). दिल्लीच्या तख्तावर बसणारा पहिला मुसलमान सुलतान व गुलाम घराण्याचा संस्थापक. हा मुइझ्झुद्दीन मुहम्मद घोरीचा गुलाम होता. स्वत:च्या कर्तृत्वामुळे तो थोर पदास चढला. हिंदुस्थानातील साम्राज्याचे रक्षण करण्याकरिता मुइझ्झुद्दीनने त्यास आपला प्रतिनिधी म्हणून नेमले.
फिरोजशाह तुघलक
फिरोजशाह तुघलक : (? १३०९ ? - २० सप्टेंबर १३८८). फिरोझशाह (फीरूझशाह) हा तुघलक घराण्यातील दिल्लीच्या तख्तावर बसणारा तिसरा सुलतान. या घराण्यातील पहिला सुलतान घियासुद्दीन (कार. १३२०-१३२५) याचा भाऊ सिपेहसालार रजब याचा हा मुलगा.
महमूद गझनी
महमूद गझनी : (१ नोव्हेंबर ९७१−३० एप्रिल १०३०?). अफगाणिस्तानातील गझनीच्या यमीनी घराण्यातील सर्वश्रेष्ठ व पराक्रमी सुलतान. भारतातील तुर्की किंवा यमीनी या मुसलमानी घराण्याच्या सत्तेशी सुरुवात महमूदापासून झाली.
मुहम्मद घोरी
मुहम्मद घोरी : (कार. ११७५–१२०६). भारतातील मुस्लिम सत्तेचा संस्थापक व दिल्लीचा पहिला सुलतान. घोरी घराण्यातील हा कर्तबगार सुलतान. शिहाबुद्दीन उर्फ मुइझ्झुद्दीन घोरी ऊर्फ मुहम्मद या नावांनी इतिहासात प्रसिद्ध आहे.
मुहम्मद तुघलक
मुहम्मद तुघलक : (कार. १३२५–२० मार्च १३५१). तुघलक घराण्यातील एक लहरी व महत्त्वाकांक्षी दिल्लीचा सुलतान. त्याचे मूळ नाव उलुवूखान. वडिलांच्या मृत्यूनंतर मुहम्मद हे नाव धारण करून तो १३२५ मध्ये गादीवर बसला. वडिलांच्या कारकीर्दीत १३२१ व १३२३ मध्ये त्याने वरंगळवर स्वारी करून तेलंगण जिंकले.
मोगलकाळ
मोगलकाळ : हिंदुस्थानात तेराव्या शतकात मुस्लिम सत्तेचा उदय झाला आणि औरंगजेबाच्या मृत्यूनंतर (१७०७) तिला अवनत अवस्था प्राप्त झाली. दिल्लीच्या सुलतानशाहीचा मोगलपूर्व काळ हा भारतातील मुस्लिम सत्तेचा पहिला कालखंड ठरतो. [→ मुसलमानी अंमल, भारतातील].
सुलेमान, पहिला
सुलेमान, पहिला : (नोव्हेंबर १४९४– ५/६ सप्टेंबर १५६६). ऑटोमन साम्राज्याचा विस्तारवादी, कलाभिज्ञ व पराक्रमी सुलतान. सुलेमान हा पहिला सलीम या शूर योद्ध्याचा एकुलता एक मुलगा होता, तर दुसरा बेयझीद या सुलतानाचा नातू होता.
English to Hindi Transliterate